उद्याचा दिवस

 

दाटून अंधार आला चौफेर

विझले दिव्यांचे पूर्ण घर

विसरून मी साऱ्या  उजेडाला

भरून त्याला घेतला शरीरभर

झोपलेत  जे युग पासून

म्हटले देवू त्यांना पसाभर

सूर्य तरी पाहतील डोळाभर

 

@राम मोरे/२५०८२०११११४२

 

Advertisements

बेजुबानी

हमारी खामोशी को बेजुबानी न समझना

कलम बेजुबान  कभी नही होती

इसे हमारी कमजोरी न समझना

@राम मोरे/०६०२२०१३१९०७

 

हात

हात

 

मावळत्या सूर्याचे दुर्बल

आणि

तुमचेही बोट  खुरटलेले हात

आमच्या अश्रूंच्या पागोळ्या

झेलू शकत  नाहीत ,

ते हातच वेगळे असतात

द्रोणागिरी पेलू शकणारे

 

अमृतवेल अंगावर खेळवणारे

वृक्ष हि तसे बेईमान असतात

कुणी आपल्यावर जगतय म्हटल्यावर

झुळकीचे निमित्त घेवून

कोसळत असतात …………

 

 

@राम मोरे /२००८१९८९

 

 

डोळे

eyes

जुलमी डोळे दोघे सदाकदा भांडत असतात
निवांत क्षणी मग हिशेब दुखाचे
अश्रू मोजून मांडत असतात !!

@राम मोरे/१८०९२०११/०८५७स

जगण

घर कसं असावं
घर म्हणजे नुसता ..जाहिरातीचा भरणा नसावा …
बाळाची खेळणी ,वाळवलेली दुपटी ,
दुधाची बाटली,खाण्याची ताटली ,
निर्मळ खळखळनारा झरा असावा !

घर म्हणजे नुसता..Interiorचा प्लान नसावा …
फुललेला सोनचाफा , चिमण्यांचा चिवचिवाट,
दुधावरची साय, मनातली माय ,
सुबक रांगोळीचा अंगण असावा !

घर म्हणजे नुसता..फोटो फ्रेमचा भरणा नसावा …
खणखणता मोबाईल ,नात्यांचा ”नेट”,
पेटवलेला दिवा , आटवलेला खवा ,
नात्याच्या गावामधला दरवळ असावा !

घर म्हणजे नुसता..फर्निचर चा शोरूम नसावा …
कुंकवाचा करंडा , हातातल्या बांगड्या ,
केसातला कंगवा, मोगऱ्याचा गजरा ,
वाट पहाणारा आरसा असावा !

@राम मोरे/०४०८२०११/०६४५प.

girl mirror

एखाद्या निवांत क्षणी ..
ढगांकडे ही बघत जा कधी
शॉवर खाली भिजता..
पावूस अनुभवत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
वाळली फुलेही बघत जा कधी
शेदूर फासता दगडा..
देव बनत नसतात कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
विस्कटलेला पटही बघत जा कधी
सोंगट्या साऱ्या बदलता..
युद्ध जिंकत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
विसरल्या वाटा बघत जा कधी
खुणा साऱ्या विसरता ..
गाव बदलत नाही कधी

एखाद्या निवांत क्षणी ..
आरश्या कडे डोकावत जा कधी
आरसे बघता तोडून
चेहरा बदलत नसतो कधी

@राम मोरे/१३.०७.२०११

आज वेळ नाही…

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात,
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही…
आईच्या अंगाईची जाणीव आहे,
पण आईला आज
‘आई’ म्हणायलाच वेळ नाही…
सगळी नाती संपवुन झालीत,
पण त्या नात्यांना
पुरायलाही आज वेळ नाही…
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये सेव आहेत,
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही…
ज्या पोराबाळांसाठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यांच्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही…
सांगेल कोण कशाला दुस-याबद्द्ल,
जेव्हा ईथे स्वतःकडेच
बघायला वेळ नाही…
डोळ्यावर आलीये खुप झोप,
पण आज कोणाकडे
झोपयलाही वेळ नाही…..
ह्रदयात वेदनांचा पूर वाहतोय,
पण ते आठवुन
रडायलाही आज वेळ नाही…
परक्यांची जाणीव कशी असेल?
जर ईथे आपल्याच माणसांसाठी आज वेळ नाही…
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या,
या संघर्षात जरा मागवळून;
पहायलाही आज वेळ नाही…
अरे जीवना तूच सांग!
जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही…!